भाजपा नेते निलेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटना अध्यक्ष बाबा परब यांनी मानले आभार
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी किनारपट्टी विनियमन क्षेत्रातून नौकानयन मार्ग जलवाहतूकीस सुकर करण्यासाठी हातपाटी पध्दतीने उत्खनन करण्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ, मुंबई यांनी विनालिलाव परवाना पध्दतीने हातपाटीद्वारे वाळू, रेती उत्खननाकरीता मंजुरी दिली आहे. कर्ली, कालावल खाडीतील गट प्रस्तावित करण्यात आले आहेत.
वाळू उतखनन परवाने लवकर मिळवे यासाठी वाळू व्यवसायिकांच्या मागणीनुसार भाजपा नेते निलेश राणे यांनी खा. नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हण यांच्या माध्यमातून शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. लवकर परवानगी प्राप्त झाली. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा वाळू संघटना अध्यक्ष बाबा परब यांनी आभार मानले आहेत.
सदर वाळू, रेती उत्खननाचे परवाने मिळण्यासाठी विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) येथे सादर करायचा आहे.
परवानगे बाबतचा अर्जाचा नमूना, आवश्यक कागदपत्रांचा तपशिल, अटी व शर्ती तसेच कालावल व कर्ली खाडीतील उत्खननासाठी खुल्या केलेल्या वाळू रेती गटांचा तपशिल इत्यादीबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://sindhudurg.nic.in) तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये व सर्व तहसिलदार कार्यालये याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तरी इच्छुक व्यक्ती/ संस्था यांनी विहीत नमुन्यातील परिपूर्ण अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह प्रस्ताव दिनांक- ०४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीमध्ये, कार्यालयीन वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग (खनिकर्म शाखा) येथे सादर करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.









