महिलांच्या आत्मसन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना:सौ. संजना सावंत

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवण्यासाठी दूत ठरलेल्या अंगणवाडी सेविका,मदतनीस यांचा सत्कार

नांदगाव(वार्ताहर): सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पर्यंत बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहेत ,तर काही लाभार्थी हे त्यांच्या त्रुटींमुळे राहीले आहेत. त्या महिलांना देखील त्रुटी दूर केल्यानंतर ती रक्कम महिलांच्या खात्यावर जमा होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लाडकी बहिण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. चतुर्थी सणाच्या पूर्वी महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाल्याने हास्य फुलले आहे. महिलांच्या आत्मसन्मानासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना असल्याचे प्रतिपादन समितीच्या अध्यक्षा तथा माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. त्या असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांच्यावतीने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवण्यासाठी दूत ठरलेल्या कासार्डे विभागातील अंगणवाडी सेविका , मदतनीस यांचा सत्कार सोहळ्यात बोलतहोत्या.

 

 

यावेळी व्यासपीठार माजी पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके , कासार्डे सरपंच निशा नकाशे , उपसरपंच गणेश पाताडे,तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , आयनल माजी सरपंच संतोष वायंगणकर, नांदगाव माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर,असलदे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोहर खोत, नांदगाव राजू तांबे, माजी सरपंच सुरेश लोके, संतोष जाधव, रघुनाथ लोके, संतोष घाडी, परशुराम परब , बाबाजी शिंदे,पप्पी सापळे,प्रदीप हरमळकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत , मंगेश राणे, कमलेश पाटील,गौस साटविलकर, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, बचत गट सीआरपी सुषमा सावंत, रिया जाधव , मनिषा परब , संगीता कदम,दिक्षा मोरजकर ,तैयसिम नावलेकर , महेश लोके आदी बहुसंख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

या सत्कार सोहळ्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट सिआरपी अशा 110 महिलांचा शाल , श्रीफळ, गुलाब झाड सत्कार करण्यात आला. तसेच लकी ड्रॉ पद्धतीने 3 पारितोषिके चिट्टी पध्दतीने काढण्यात आली आहे , यामध्ये भारती कांडर,अपूर्वा बाळा परब , शांती चिके अनुक्रमे पारितोषिके विजेता ठरल्या. असलदे चेअरमन भगवान लोके म्हणाले,राज्यातील महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे.त्याची प्रभावी अंमलबजावणी कणकवली विधानसभा मतदारसंघात झाली आहे,त्याचे श्रेय आ.नितेश राणे यांना जात आहे.त्याच बरोबर या योजनेच्या अध्यक्षा संजना सावंत सातत्याने पाठपुरावा करत जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत असे सांगितले.या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार पंढरी वायंगणकर यांच्या पुढाकाराने झाला, त्यामुळे तुमच्यावर या योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी जबाबदारी आहे.ज्या ठिकाणी अडचणी असतील तिथे आम्ही सर्व भाऊ म्हणून उभे राहू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार सानिका तांबे यांनी मानले.