अहमदाबाद-कुडाळसह मंगळूर स्पेशलला जादा दोन डबे

खेड (प्रतिनिधी) गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या अहमदाबाद-कुडाळ व अहमदाबाद-मंगळूर गणपती स्पेशलला स्लीपर श्रेणीचे दोन अतिरिक्त डबे तात्पुरत्या स्वरुपात वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले आहे.
त्यानुसार अहमदाबाद-कुडाळ स्पेशल मंगळवारी दोन अतिरिक्त डब्यांची थावली. तर परतीच्या प्रवासात ४ सप्टेंबर रोजी दोन अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. अहमदाबाद- मंगळूर स्पेशल ६ सप्टेंबर व परतीच्या प्रवासात ७ सप्टेंबर रोजी दोन स्लीपर श्रेणीच्या अतिरिक्त डब्यांची धावणार आहे. यामुळे गर्दीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.