खेड(प्रतिनिधी) शनिवारपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार असल्याने घरांच्या रंगरंगोटीसह गणरायाची आरास तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गणेशचतुर्दशीच्या दिवशी शहरासह ग्रामीण भागात १३७८६ गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये २० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे.
शहरात शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव, शिवसेना
उद्भव बाळासाहेब ठाकरे सार्व. गणेशोत्सव मंडळ, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गणपती, टायटनचा राजा गणेशोत्सव मंडळ, एसटी आगार सार्वजनिक
गणेशोत्सव मंडळ, मुरली मनोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा समावेश आहे.
ग्रामीण भागात १३ सार्वजनिक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये वडार समाज युवक मंडळ भरणे पुरस्कृत जयगणेश मित्रमंडळ-आंबवली रोड भरणे, महाराष्ट्र बेलदार संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- भरणेनाका, वडार समाज संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- दस्तुरी -चिंचघर, संघर्ष मित्रमंडळ सार्व. गणेशोत्सव-भरणेनाका, बंजारा समाज मंडळ-वेरळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-आंबवली. एम.आय.डी.सी. मंडळ-पीरलोटे, नातूवाडी प्रकल्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ-भरणे, अग्निशामक कर्मचारी गणेश मंडळ- आदींचा समावेश आहे.









