झापडे गावातील विकासकामे चुटकीसरशी मार्गी
लांजा (प्रतिनिधी) बैठकीत ग्रामस्थांनी केलेली विकास कामे बैठकी नंतर अवघ्या चार दिवसात मंजूर केल्याने झापडे गावातील मानकरी, ग्रामस्थांनी रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत यांचे विशेष आभार मानले.
तालुक्यातील, झापडे गावातील मानकरी, ग्रामस्थांची बैठक रत्नसिंधू योजना सदस्य किरण सामंत यांच्या सोबत पार पडली होती . या बैठकीमध्ये मानकरी व ग्रामस्थांनी झापडे धरण कॅनल व मोबाईल टॉवर त्वरित मंजूर होणेबाबत मागणी केली होती. बैठक होऊन चारच दिवसात झापडे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारा झापडे धरण ते झापडे गाव कॅनॉल व मोबाईल टॉवरला किरण सामंत यांच्या माध्यमातुन मंजूरी मिळाली असून किरण सामंत यांच्या कामाबद्दल झापडे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, सचिव वसंत घडशी, उपतालुकाप्रमुख सुहास खामकर, संतोष साटले, यांचेसह शंकर माजळकर, अभिजीत राजाध्यक्ष, तुकाराम पन्हळेकर, अनिल पन्हळेकर, अजित खेगडे, संजय कोंडस्कर, आनंद राजाध्यक्ष, विजय बंडबे, दिनेश माजळकर, सुभाष पन्हळेकर, मधुकर पन्हळेकर, आशिष रेऊरकर, अक्षय बंडबे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.










