बहादुरशेख नाका येथे रक्ताच्या थारोळ्यात युवकाचा मृतदेह
खून झाल्याचा संशय
रत्नागिरी | प्रतिनिधी
ऐन गणेशोत्सवात चिपळूण शहर हादरले आहे . येथे बहादूर शेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला असून मोठी खळबळ उडाली आहे. या युवकाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.
चिपळूणचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र कुमार राजमाने हे चिपळूण पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. हमीद शेख असे या तरुणाचे नाव असल्याची प्राथमिक माहिती असून हा सगळा हादरवून टाकणारा प्रकार रविवारी सकाळी काही वेळापूर्वी उघडकीस आला आहे.
चिपळूण शहरातील बहादूरशेख नाका हा गजबजलेल्या भाग आहे. येथे या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने चिपळूण हादरले आहे. चिपळूण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ऐन गणेशोत्सवच्या आनंदाच्या काळात चिपळूण शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे.










