RATNAGIRI: गोळप सडा येथे झाली दुचाकीची चोरी

A bike was stolen in Golap Sada

रत्नागिरी | प्रतिनिधी: तालुक्यातील गोळप सडा येथील एका अपार्टमेंटच्या पार्किंगमधील दुचाकी अज्ञाताने लांबवली.याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना शनिवार 13 मे रोजी रात्री 9 ते मंगळवार 16 मे रोजी सकाळी 10 वा.कालावधीत घडली आहे.

याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार,शनिवारी रात्री त्यांनी आपली हिरो होंडा सीडी डिलक्स (ंएमएच-08-एए-4762) रेड स्टोन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती.16 मे रोजी सकाळी ते दुचाकी घेण्यासाठी पार्किंगमध्ये गेले असता त्यांना दुचाकि दिसून आली नाही.फिर्यादीने आजुबाजुला दुचाकिचा शोध घेउन अखेर बुधवार 24 मे रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास पूर्णगड पोलिस करत आहेत.