गुहागर प्रतिनिधी
गणपती सणासाठी आपल्या मुळ गावी येण्यासाठी निघालेला गुहागर तालुक्यातील खोडदे येथील तरुण दिनांक 6/ 9/ 2024 रोजी रात्री पहाटे 12 वाजून पाच मिनिटांनी दादर रेल्वे स्टेशन वरून सुटणारि तुतारी एक्स्प्रेसने गावि येण्यासाठी निघाला होता. मात्र तो तरुण आपल्या गावी न पोचता त्याचा मृतदेह दिनांक 8/ 9 /2024 रोजी दुपारी तळोजा नदीमध्ये सापडून आला.
त्याच्या या मृत्यूने खोडदे गावावरती शोककळा पसरली आहे. हा तरुण जर तुतारी एक्सप्रेसने गावी येण्यासाठी निघाला असताना तो गावी न पोचता त्याचा मृतदेह तळोजा खाडीमध्ये कसा सापडला याची चौकशी पोलीस करीत आहेत.
कुमार अक्षय संतोष साळवी वय वर्ष 28 मुळगाव खोडदे तालुका गुहागर सध्या राहणार मुंबई भांडुप येथे. त्याचा मृत्यू देह उपजिल्हा रुग्णालय पनवेल रायगड येथे आहे. त्याच्या मृत्यूची. माहिती मिळताच खोडदे गावातून त्याचे नातेवाईक पनवेल येथे दाखल झाले आहेत या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.











