मोरवंडे ज्ञानदीपमध्ये ग्रंथ प्रदर्शन

खेड (प्रतिनिधी) ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल
(सीबीएसई) मध्ये चिपळूण येथील भावार्थ पब्लिकेशन्स यांच्यामार्फत ग्रंथ प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात ५०० हून अधिक पुस्तकांचा समावेश होता.
प्राचार्य भरत मोरे यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना ग्रंथ
प्रदर्शनाचा अधिकाधिक लाभ घेऊन ज्ञान समृद्ध करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी पुस्तके खरेदी केली. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागप्रमुख राजेश किट्टद, प्राथमिक विभागप्रमुख शर्वरी शिर्के आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण यांनी तर आभार प्रज्ञा चिंदे यांनी मानले.