कोकिसरे नजीक अपघात
वैभववाडी प्रतिनिधी
मोटर सायकल स्वारास पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या मोटर सायकलस्वाराने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्याला पुढील उपचारासाठी कणकवली येथे हलविण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान महालक्ष्मी पेट्रोल पंप कोकिसरे नजीक घडला.
याबाबत फिर्यादी संतोष परशुराम पावस्कर रा. वेंगसर सध्या राहणार मुंबई हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन वेंगसरवरून नापणेकडे निघाले होते. तर यश अनंत गुरव व संतोष दत्ताराम गुरव रा. शर्पे हे वैभववाडी वरून तळेरेच्या दिशेने निघाले होते. दोन्ही मोटरसायकल महालक्ष्मी पेट्रोल पंपा समोर आल्यास असता यश गुरुव याने संतोष पावस्कर यांच्या मोटरसायकलला सायलेन्सर च्या बाजूने घडक दिल्याने तिघेजण खाली पडून जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असुन त्याला कणकवली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. यासंदर्भात संतोष परशुराम पावस्कर राहणार वेंगसर यांनी वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली असून वैभववाडी पोलिसांनी संशयित आरोपी यश अनंत गुरव यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या अपघातात दोन्ही मोटरसायकलचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.







