वरवडे परबवाडी येथे गणेश सजावट स्पर्धा मंगळागौर कार्यक्रम संपन्न

 

 

सुरेखा प्रतिष्ठान तसेच लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडे यांच्या वतीने आयोजन 

स्वप्निल कदम l कणकवली   :    वरवडे परबवाडी येथे सुरेखा प्रतिष्ठान तसेच लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडे परबवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश सजावट स्पर्धा तसेच मंगळागौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. परबवाडी येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. गणेश सजावट स्पर्धेमध्ये अक्षय परब याने प्रथम क्रमांक पटकावला. तर आदित्य परब गोठणकर याने दुसरा, तर अजित परब याने तिसरा क्रमांक पटकावला. यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस संदीप परब, हर्षदा कृष्णकांत परब यांनी पटकावला. यावेळी लहान मुलां करिता विनायक परब यांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते

 

 

 

या स्पर्धेमध्ये परबवाडी येथील 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरविण्यात आले सुरेखा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भारती ताई परब हेगडे यांनी विजेत्या स्पर्धकांचे तसेच मंगळागौर कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांचे अभिनंदन केले. यावेळी त्या म्हणाल्या ज्या माऊलीने आपणास जन्म दिला तिचे स्मरण करण्यासाठी आईच्या नावाने सुरेखा प्रतिष्ठान संस्था उभी केली. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा हा उद्देश ठेवून महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक महिलांनी असेच पुढे येऊन आपला आनंद द्विगणित करावा असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला कणकवली माजी सभापती मनोज रावराणे यांनी उपस्थित राहून महिलांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबाबत सौ भारती ताई यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी श्री लिंगेश्वर एक्यवर्धक मंडळ अध्यक्ष सुनील परब, चंद्रकांत परब उर्फ मास्तर, अशोक परब, प्रभाकर परब, कृष्णकांत परब, मधुकर परब, सुरेखा प्रतिष्ठानचे संजय परब, सुरेश परब, शिल्पा कुलकर्णी, नंदू परब तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होते.