साळशी येथे गवारेड्याकडून काजुबागांची नासधूस ; शेतक-यांचे नुकसान

शिरगाव (प्रतिनिधी)

देवगड तालुक्यातील साळशी येथील शेतकरी सुनील पारधी,यतीन पारधी व चंद्रकांत शिवलकर यांच्या २०-२५ वर्षाच्या फलधारणा होणा-या काजूच्या झाडांची शुक्रवारी रात्री मोठ्याप्रमाणावर नासधूस केली. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले आहे.

मोठ्या मेहनतीने जोपासना केलेल्या काजूच्या झाडांच्या फांद्या मोडून मुळासह झाडे उपटून टाकून नासधूस केली.त्यामुळे उत्पन्न देणारी काजूची झाडे नष्ट झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानग्रस्त घटनेची देवगडचे वनपाल श्रीकृष्ण परीट व वनरक्षक रामदास घुगे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

यावेळी शेतकरी सुनील पारधी,यतीन पारधी,चंद्रकांत शिवलकर, पोलिस पाटील कामिनी नाईक, माजी सरपंच वैभव साळसकर, प्रभाकर घाडी आदी उपस्थित होते.

वनविभागाकडून या वनप्राण्याचा बंदोबस्त करावा. अशी शेतक-यांतून मागणी होत आहे.

 

शासनाकडून वनप्राण्याकडून नुकसान झाल्यास काजूच्या झाडास मिळणा-या तुटपुंजा मदतीत वाढ करून मिळावी अशी मागणी यावेळी माजी सरपंच वैभव साळसकर यांनी यावेळी केली आहे.