चिपळूण (प्रतिनिधी):– भाजपा चिपळूणतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उदंड आणि सुदृढ आयुष्याकरिता शहरातील पाग श्री गणेश मंदिर येथे गणेश अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत साध्या व सात्विक वातावरणात मंत्रघोष, आरतीने कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीरकाका भागवत, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक विजय चितळे, आशिष खातू, उपाध्यक्ष भरत परब, सरचिटणीस सारिका भावे, विनायक वरवडेकर, चिटणीस प्रणाली सावर्डेकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस अविनाश सावर्डेकर, महिला मोर्चा शहराध्यक्षा शीतल रानडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रभंजन पिंपुटकर, प्रसिद्धी मीडिया प्रमुख अमृता जोशी, महिला मोर्चा सरचिटणीस क्षितिजा मांजरेकर, चिटणीस जया केतकर, स्वाती पटवर्धन, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रद्धा कदम, बेटी बचाव बेटी पढाव च्या शहराध्यक्षा साधना कात्रे, सैनिक सेलचे आत्माराम कदम, ग्रामस्थ संदीप कानिटकर, कीर्ती भागवत, ज्येष्ठ नागरिक विनया जोशी यावेळी उपस्तिथ होते.
अविनाश सावर्डेकर यांच्या हस्ते श्रीं वर अभिषेक करण्यात आला. यावेळी समस्त भारतवासियांच्या वतीने मोदीजींना दीर्घायुष लाभावे म्हणून पुरोहित समीर जोशी यांनी श्रीं जवळ प्रार्थना केली.












