चिपळूण (प्रतिनिधी):–चिपळूण नगर परिषदेतर्फे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ झाला.
या कार्यक्रमातंर्गत चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उप-कार्यकारी अभियंता श्री. पाटणकर तसेच यूनियन बँक चे शाखा प्रबंधक हितेश गजबीये, आयुष्यमान भारत योजनेची माहिती व मार्गदर्शन देणेकारिता श्रीम. दर्शना मोरे, प्रधानमंत्री आवास योजनेचे सुरज चिपळूणकर, एल.पी.जी.उज्वला गॅस योजनेची माहिती देणे करिता चिपळूण गॅस सर्व्हिसेस चे प्रशांत सांगळे, लक्ष्मी गॅस सर्व्हिसेसचे अक्षय बुरबाडकर उपस्थित होते.
तर चिपळूण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे, रचना सहाय्यक श्रीम.नम्रता खैरमोडे व नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी वृंद उपस्थित होते.












