
लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुका भाजपाच्या वतीने आज शुक्रवारी सकाळी लांजा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राजाचे बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, जिल्हा सचिव हेमंत शेट्ये, शहर अध्यक्ष गुरुप्रसाद तेली, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर टोळे, तालुका सरचिटणीस शैलेश खामकर, सरचिटणीस विराज हरमले, जि़ल्हा कमिटी सदस्य शेखर सावंत, कोट उपसरपंच रविंद्र नारकर, शिवाजी पराडकर, जिल्हा कमिटी सदस्य वाघोजी खानविलकर,नचिकेत पेंढारी, अशोक पाटाळे, अनिल पन्हळेकर, राजेंद्र हरमले, वसंत हरमले, व इतर कार्येकर्ते उपस्थित होते.












