राजापूर अर्बन को. ऑप. बँकेची रविवारी २२ सप्टेबर रोजी १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

राजापूर (वातार्हर): येथील राजापूर अर्बन को. ऑप. बँकेच्या सभासदांची १०३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९.३० वाजता नवाळे कॉम्लेक्स मातोश्री सभागृहात संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

 

या सभेत मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. दि. ३१ मार्च २०२४ अखेरच्या वार्षिक अहवाल, नफा-तोटा पत्रक, ताळेबंद यांची नोंद घेणे, दि. ३१ मार्च २०२४ अखेरच्या वैधानिक लेखापरीक्षण अहवाल / दोष अहवाल यांची नोंद घेणे. सन २०२३-२०२४ अखेर झालेल्या नफा विभागणीस मान्यता देणे व लाभांश जाहीर करणे. सन २०२४-२०२५ सालाकरिता वार्षिक अंदाजपत्रकास मंजुरी देणे व सन २०२३-२०२४ मधील अंदाजपत्रकातील खर्चाची माहिती देणे व मान्यता घेणे. उपविधी दुरुस्ती प्रस्तावास मंजुरी देणे. संचालकांना व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाची माहिती घेणे. सन २०२४-२०२५ सालाकरिता वैधानिक लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे व मानधनास मान्यता देणे. बँकेच्या वार्षिक विकास आराखडयास व दिर्घ मुदती विकास आराखडयास मंजूरी देणे, सभासदांकडून ताळेबंद पत्रक व नफा – तोटा पत्रक यांस अनुसरून आलेल्या लेखी स्वरूपातील सूचना यांची वाचून नोंद घेणे आणि आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
या बैठकीला सर्व सभासदांनी उपस्थीत रहावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी केले आहे.
—————————————————————————————-