तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

As many as 383 cases of electricity theft worth approximately three and a half crores were revealed in the state during a three-day special inspection campaign

महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राबविलेल्या तीन दिवसीय विशेष तपासणी मोहिमेत राज्यात अंदाजे साडेतीन कोटींची तब्बल ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली आहेत.महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाअंतर्गत असलेल्या कोकण, पुणे, नागपूर व छत्रपती संभाजीनगर या चारही परिक्षेत्रांमध्ये २४ ते २६ एप्रिल दरम्यान विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली. या विशेष तपासणी मोहिमे दरम्यान एकुण ३८३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आणण्यात आलेली आहेत. या तीन दिवसांमध्ये नागपूर परिक्षेत्रांतर्गत सर्वाधिक १२१, कोकण परिक्षेत्रात ११७, औरंगाबाद परिक्षेत्रात ९२ तसेच पुणे परिक्षेत्रांतर्गत ५३ वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत.
वीजचोरी प्रकरणांमध्ये मोठया प्रमाणात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.