रत्नागिरी शहरातील २ घरफोड्या उघडकीस
मूळच्या रायगडच्या स्वप्निल मयेकरला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक
रत्नागिरी | प्रतिनिधी : दिनांक 14/09/2024 रोजी रात्रौ 10 वा. चे सुमारास मारुती मंदीर परिसरातील दोन अपार्टमेंटमध्ये ओमकार डेव्हलपर्स व स्टार इन्सुरन्स कंपनी यांचे ऑफिस फोडून चोरी घरफोडी करुन त्यामधून रोख रक्कम व सीसीटीव्ही डिव्हीआर चोरुन नेण्यात आलेला होता. त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. रत्नागिरी शहरातीतील मध्यवर्ती ठिकाणी मारुतीमंदीर परिसरामध्ये झालेल्या घरफोड्यांच्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक
नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ नियुक्त करुन गुन्हयाचा
समांतर तपास सुरु केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने घटनास्थळावरील तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूस असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन सदरचे दोन्ही गुन्हे हे मुंबई येथील रेकॉर्डवरील आरोपी स्वप्नील राजाराम मयेकर याने केलेले असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर स्थागुअशा पथकाने ठाणे, नवी मुंबई, मुंबई व रत्नागिरी इत्यादी ठिकाणी आरोपी स्वप्नील मयेकर याचा अहोरात्र शोध घेवून गोपनीय माहीतीच्या आधारे दि. 22/09/2024 रोजी त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी स्वप्निल राजाराम मयेकर वय 38 वर्षे मूळ रा. सेक्टर 19, खारघर, जिल्हा रायगड सध्या रा. छाया गेस्ट हाऊस, रत्नागिरी यांने वर नमुद दोन्ही गुन्हयाची कबुली दिलेली असून गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल, गुन्हा करण्यासाठी वापरलेले साहीत्य त्याचेकडून जप्त करण्यात आलेले आहे. तसेच एल.टी.मार्ग पो. ठाणे मुंबई व पनवेल शहरामध्येही गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
1. रत्नागिरी शहर पो. ठाणे गु.र.नं 351/2024 भा. न्या. सं. कलम 331 (3), 331 (4), 305
2. रत्नागिरी शहर पो. ठाणे गु.र. नं 353/2024 भा. न्या. सं. कलम 331 (3), 331 (4)305,324(4)
3. एल.टी. मार्ग पो. ठाणे मुंबई गु.र.नं 505/2024 भा.द.वि. कलम 457, 380
4. पनवेल शहर पो. ठाणे गु.र.नं. 540/2024 भा.न्या.सं.305, 331(3) (4), 324(4) वगैरे
आरोपी स्वप्निल राजाराम मयेकर हा मुंबई व ठाणे येथील रेकॉर्डवरील सहाईत गुन्हेगार असून त्याचेवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई इत्यादी ठिकाणी चोरी घरफोडीचे सुमारे 20 गुन्हे दाखल आहेत. तसेच गुजरात व गोवा या राज्यामध्ये सुध्दा गुन्हे केलेले आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमुद पोलीस अधिकारी / अंमलदार यांनी केलेली आहे.
सपोनि / श्री.तानाजी पवार
पोहेकॉ/ विजय आंबेकर
पोहेकॉ / योगेश नार्वेकर
पोहेकॉ / दिपराज पाटील
पोकॉ/ अतुल कांबळे
पोहेकॉ / शांताराम झोरे
पोहेकॉ / विवेक रसाळ
पोहेकॉ / रमिज शेख









