खेड : होडखाडमध्ये घरफोडी १ लाखांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्यावर गुन्हा

crime sonyachi chori
खेड(प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील खाडी पट्टा विभागातील होडखाड वरची वाडी येथे अज्ञात चोरट्याने घर फोडून घरातील सुमारे १ लाख ९ हजाराचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना १९ रोजी  पहाटे ४. वाजण्याच्या सुमारास उघड झाली.
या घटनेतील  फिर्यादी व त्यांची आई तसेच मुलगी असे त्यांचे गावातील रामनवमीच्या कार्यक्रमाला गेले असता  अज्ञात इसमाने फिर्यादी यांच्या घरावरील कौले काढुन त्यावाटे आत प्रवेश करुन बेडरुममधिल लोखंडी कपाटात ठेवलेली चावी शोधुन तिजोरी उघडुन त्यामध्ये ठेवलेली  १,लाख ९ हजाराचा  रु. किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला या  मध्ये ५० हजार रु. कि.ची. १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन,  २४,हजार  रु. कि.ची. ६ ग्रॉम वजनाची सोन्याची अंगठी १९ हजार  रु.कि.ची. ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील डुल व १६ हजार  रु. रोख असा मुद्देमाल चोरून नेला.