चिपळूण– परशुराम एज्युकेशन सोसायटी ,चिपळूण ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवित असते. असाच एक उपक्रम संस्थेतील प्रशालेच्या विद्यार्थ्यांसाठी संस्था राबविणार आहे.
मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा येथे विद्यार्थ्यांच्या मेंदू विकसनासाठी विविध उपक्रम चालतात. त्यातील फिरते ‘माईंड जिम’ हा उपक्रम परशुराम एज्युकेशन सोसायटी,चिपळूण व मनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूण शैक्षणिक संकुलातील शाळांतील विद्यार्थी,पालक तसेच नागरिकांसाठी दि.२५ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत विनामूल्य आयोजित केला आहे.
या काळात हे प्रदर्शन संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात असणार आहे. सकाळी ९ ते ५ या वेळेत विद्यार्थी या प्रदर्शनाचा लाभ घेतील तर संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत विद्यार्थ्यांसाठी व अन्य नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुले असेल तसेच विद्यार्थ्यांबरोबर पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.
तरी सर्व विद्यार्थी व पालकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी,असे आवाहन परशुराम एज्युकेशन सोसायटीकडून करण्यात येत आहे.











