परुळेबाजार ग्रा. प.चे ग्रामसेवक शरद श्रीरंग शिंदे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..

 

 

वेंगुर्ले l दाजी नाईक :वेंगुर्ले तालुक्यातील परूळेबाजार गावचे ग्रामसेवक श्री शरद श्रीरंग शिंदे यांना महाराष्ट्र शासनाच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागामार्फत विशेष पुरस्कार देऊन संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

ग्रामसेवक श्री. शरद शिंदे हे मूळचे अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल तालुक्यातील परूळेबाजार आपली कर्मभूमी मानून त्यांनी आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहे. परूळेबाजार गावात आपले कर्तव्य पार पाडत असताना अचूक नियोजन आणि परिपूर्ण कार्यवाही या दुहेरी तत्वावर भर दिला. त्याचीच परिणीती म्हणजे परूळेबाजार ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक राज्यस्तरावर उल्लेखनीय यश मिळाले आहे.

श्री. शरद शिंदे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे. सध्या त्यांच्याकडे वेंगुर्ले तालुक्यातील मेढा निवती ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार आहे. आपल्या बुद्धिमत्ता, अचूक नियोजन आणि कल्पकतेच्या जोरावर ते याहीपेक्षा चांगल यश संपादन करतील असा विश्वास सर्वसामान्य आणि अधिकारी वर्गातून व्यक्त होत आहे. राज्यस्तरीय संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत परुळेबाजार, या ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर यश संपादन केले आहे. त्यात त्यांचा मोलाचं वाटा आहे.