वेंगुर्ले येथे ‘द्विभुज गणपती’चे वाळूशिल्प सर्वांचे ठरत आहे आकर्षण

 

वेंगुर्ले | दाजी नाईक : वेंगुर्ले दाभोसवाडा येथील संजू हुले या कलाकाराने आज गणेश जयंती निमित्त बंदर रोड येथील झुलत्या पुलानजीक सुंदर असे रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपतीचे वाळूशिल्प साकारले आहे.
संजू हुले हा कलाकार सण, उत्सव, जयंती या दिवशी विविध वाळू शिल्प साकारत असतात. त्यांच्या कलाकृतीला सर्वांकडून दाद मिळते. आज गणेश जयंती असल्याने हुले यांनी सुंदर असे रेडी येथील द्विभुज गणपतीचे वाळूशिल्प साकारले आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी नागरिकाकडून गर्दी होत आहे.