मंडणगड : प्रतिनिधी :दळवी शैक्षणिक आणि चॅरिटेबल ट्रस्ट संचलित महाराष्ट्र तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रशासकीय विभागामार्फत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मा. संचालक डॉ. प्रमोद नाईक यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या मध्ये शिष्यवृत्ती संदर्भात जागरूकता आणण्याकरिता विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निकिता तांबे हिने केले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना दळवी कॅम्पस हेड विशाल नटे म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी व्हावे व त्यांना समाजाचा कृतीशील घटक म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक ते असलेली शैक्षणिक पात्रता प्राप्त करुन घेण्यासाठी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना कार्यान्वित आहेत यांचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांनी घ्यावा.”
या विशेष मोहिमे अंतर्गत संबंधित योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेची माहिती देणे, फलक लावणे व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेणे आदी उपक्रम राबविण्यात आले, विदयार्थ्यांना त्यांच्या पात्रते नुसार योजनांची माहिती पीपीटी प्रेसेंटेशन माध्यमातून देण्यात आली, यातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे फायदे मिळतील असा मनोदय प्राचार्य अरुण ढंग यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक अजय दळवी, दळवी कॅम्पस हेड विशाल नटे याचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.











