खेड मध्ये पावसाचा धुमाकूळ , कुडोशी नजीक झाड कोसळलले 

 

 

खेड(प्रतिनिधी)गेल्या दोन दिवसां पासून तुफान कोसळ त असलेल्या पावसाने सलग तिसऱ्या दिवशी ही आपला जोर कायम ठेवला यामुळे जगबुडी सह नारिंगी नदी पात्रात कमालीची वाढ झाली

 

गुरुवारी शहरा सह ग्रामीण भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले यामध्ये यामुळे अंशतः जन जीवन विस्कळीत झाले खेड आंबवली मार्गावर जुनाट वृक्ष कुडोशी येथे रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी मांडवे पोलिस पाटील.श्री नरेश तांबे व वाडी बेलदार पोलिस पाटील श्री.दत्ताराम जाधव हे तेथून प्रवास करत होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः झाडी तोडून बाजूला केली , व वाहतूक मोकळी करून दिली. त्यांच्या या समय तत्पर सेवेसाठी त्यांचे कौतुक होत .

 

दरम्यान सांयकाळी उशीरा पावसाचा जोर कायम राहिल्याने प्रशासना कडून देखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत