दोडामार्ग । प्रतिनिधी : साटेली भेडशी येथील यशवंत धणे॔, विजय धणे॔ व शैलेश धणे॔ यांच्या विरुद्ध साटेली भेडशी येथील एका महिलेने तिचा विनयभंग करून मारहाण केल्याचे आरोप करण्यात आलेले होते व सदर आरोपींच्या विरुद्ध सेक्शन ३५४, ३२३, ५०४, ५०६ , ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दोडामार्ग येथील जुडीशियल मॅजिस्ट्रेट यांचे कोर्टत दाखल करण्यात आला.
फिर्यादीच्या वतीने सरकार पक्षाने चार साक्षीदार तपासण्यात आले . सदरच्या साक्षीदारांच्या तोंडी जबाबदातून तसेच पोलिसांनी केलेल्या तपास कामातील विसंगती मे. कोर्टात आरोपीच्यावतीने ॲड. अभिजीत पणदूरकर व सुभाष पणदूरकर यांनी कोर्टात दाखवून दिले व तसा युक्तिवाद केला व तो युक्तिवाद ग्राह्य मानून दोडामार्ग येथील जुडीशियल मॅजिस्ट्रेट यांनी आरोपी यशवंत धणे॔ विजय धणे॔ व शैलेश धणे॔ यांची फिर्यादी यांनी केलेल्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने ॲड. अभिजीत पणदूरकर व ॲड. सुभाष पणदुरकर यांनी काम पाहिले.











