शिक्षक नेते शरद अर्जुन नारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी, शिक्षक वृंद व मित्रमंडळी यांची प्रमुख उपस्थिती

स्वप्निल कदम वैभववाडी
शिक्षक नेते शरद अर्जुन नारकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी शिक्षक मित्र अनेक उच्च पदावर काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व शरद नारकर मित्रपरिवार यांच्यावतीने सत्कारमूर्ती शरद नारकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. नारकर परिवार, वैभववाडी शिक्षण संस्था यांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी वैभववाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, माजी जि. प. वित्त बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर, उद्योजक सुनील नारकर, शांताराम देसाई, माजी सभापती बापी मांजरेकर, अरविंदराव रावराणे, भालचंद्र साठे, देवानंद पालांडे, हुसेन लांजेकर, संभाजी खाडे, प्रवीण मापनकर, दत्तगुरु गावकर, ऍडव्होकेट मटकर, माजी समाज कल्याण सभापती रत्नागिरी परशुराम कदम, मनोज कुलकर्णी, तानाजी कदम, विजय केळकर, बाजीराव मोरे, सुनील चव्हाण, सुरेश हरकुलकर, नितीन जठार, उदय शिरोडकर, तानाजी कदम, भूषण मोरे, डॉक्टर धनंजय रासम, अशोक नारकर, विनायक जाधव, प्राचार्य डॉक्टर काकडे, मनोज पवार, नरेंद्र मोरे, प्रकाश साळुंखे, स्नेहलता चोरगे, वीरेंद्र मोरे,नेहा मोरे, परशुराम इस्वलकर, उज्वला नारकर, शिवराज नारकर, विद्या शिरोडकर, डॉक्टर शरद जाधव, शिल्पा जाधव, प्रमोद कामत, मनोहर मोरे, विशाल पावस्कर, कमलाकर हरकुलकर, दिनकर केळकर, एस एम बोबडे, बजरंग मोहिते, गौतम तांबे, संदेश तुळसणकर, तसेच मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शिक्षक वृंद शरद नारकर गुरुजी प्रेमी तसेच त्यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी सत्कारमूर्ती शरद नारकर मनोगतातून म्हणाले की, माणसाने माणसाशी माणसासारखे वागल्यास माणुसकी हाच धर्म मानून काम केले पाहिजे. आतापर्यंतच्या जीवनात अनेक सुखदुःख आले. जीवनात आनंद मिळवता आला पाहिजे. दुसऱ्याचे दुःख दिसते हेच माझे भाग्य. आज पर्यंत मित्रपरिवाराने दिलेल्या प्रेमामुळे मी माझ्या क्षेत्रात यशस्वी काम करू शकलो असे सांगत उपस्थित आमचे आभार मानले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शरद नारकर यांना मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप परटवलकर यांनी केले