रिक्षा आणि मोटरसायकल अपघात प्रकरणी मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल

 

लांजा (प्रतिनिधी) एसटी बस आणि मोटरसायकल अपघात प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात मोटर सायकल स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना दिनांक २५ सप्टेंबर रोजी लांजा साटवली मार्गावर गोळवशी आमट्याचा वहाळ या ठिकाणी घडली होती.

 

 

तालुक्यातील साटवली मुस्लिम वाडी येथील वसीम अजीज गवंडे (वय ३५, राह. साटवली मुस्लिम वाडी ) हा आपल्या ताब्यातील ग्लॅमर मोटरसायकल क्रमांक (एम एच ०८ ए ए ०४६८) घेऊन साटवलीहून लांजाकडे येत असताना लांजाहून साटवलीकडे जाणाऱ्या एसटी बसला धडक झाली होती. या अपघातात मोटरसायकलस्वार वसीम गवंडे हा गंभीर जखमी झाला होता .

 

 

रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता मोटरसायकल हयगईने व अविचारणे वेगाने चालवून उजव्या बाजूला रॉंग साईडला जाऊन एसटी बसला धडक घेऊन अपघात करून स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५(असं) मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल टी. एस. मोरे हे करत आहेत.