कणकवली : कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे खासदार नारायण राणे संपर्क कार्यालयासमोर ३ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
३ रोजी सकाळी ९ वाजता श्री पटकीदेवी बाजारपेठ मार्गे देवीचे आगमन, सकाळी १० वाजता प्राणप्रतिष्ठापना व महाआरती, दुपारी ३ वाजता भजन नामदेव गिरकर, मसुरे, दुपारी ४ वाजता भजन सचिन मेस्त्री, कलमठ, सायंकाळी ५ वाजता भजन चंद्रकांत माजगावकर, नागवे, रात्री ८ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचे “सुहासिनीची सत्त्वपरीक्षा” अर्थात ‘अंबादर्शन’ दशावतारी नाटक. ४ रोजी रात्री ८ वाजता सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ ‘त्री नयना महिमा’ दशावतार नाटक. ५ रोजी रात्री ८ वाजता दशावतार नाटक जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस नाटक “घृणेश्वर लिंगस्थापना”. ६ रोजी रात्री ८ वाजता दशावतारी नाटक पार्सेकर दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ला, नाटक “भैरी भवानी”. ७ रोजी रात्री ८ वाजता दशावतार नाटक वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ, तेंडोली, ट्रिक सीन. ८ रोजी रात्री ८ वाजता तिरंगी डबलबारी सामना श्रीभूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ खुडी (देवगड) बुवा संतोष जोईल विरुद्ध हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे, कुडाळ बुवा गुंडू सावंत विरुद्ध महादेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नाडण बुवा संदीप पुजारे यांच्यात होणार आहे. ९ रोजी वाजता दशावतार नाटक अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, ओरोस नाटक ‘महिमा नारीशक्तीचा’. १० रोजी रात्री ८ वाजता दशावतार नाटक वालावलकर दशावतार नाट्यमंडळ नाटक ‘वरदायिनी देवी’. ११ रोजी रात्री ८ वाजता दशावतारी नाटक बाबी कलिंगण प्रस्तुत दशावतार नाट्यमंडळ नाटक ‘महिमा अनंत चतुर्दशीचा’. १२ ऑक्टोबर रोजी दसरा सकाळी ८ वाजता कुंकुमार्चन पूजा, रात्री वाजता डबलबारी श्री गावदेवी प्रासादिक भजन मंडळ कांदिवली, मुंबई उमेश पुंडलिक वंजारे विरुद्ध मालवीर भूतनाथ महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडी ( देवगड ) बुवा शुभम पाळेकर यांच्या होणार आहे. १३ ऑक्टोबर सायंकाळी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन कणकवली तालुका भारतीय जनता पार्टी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे.










