भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा तरुणांना आरोग्यदायी जीवनाचा संदेश

मळेवाड । प्रतिनिधी : मळेवाड – कोंडुरे येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर ‘स्ट्रॉंग आर्म फिटनेस’ या अत्याधुनिक व्यायामशाळेचे उद्घाटन भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण बर्वे आणि प्रसाद नाईक यांनी उत्कृष्ट नियोजन करून व्यायामशाळेची आकर्षक बांधणी केली ज्यामुळे परिसरातील तरुणांसाठी आरोग्य आणि फिटनेसचे नवे केंद्र उपलब्ध झाले आहे.
यावेळी विशाल परब यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना दररोज एक तास व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आणि व्यायामाच्या दिशेने वळून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा दिली. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचेही विशाल परब यांनी कौतुक केले आणि पंचक्रोशीतील पदाधिकाऱ्यांनी नेहमीच समाजाच्या पाठीशी राहावे, असे आवाहन केले.
या उद्घाटन सोहळ्याला भाजपचे तालुका उपाध्यक्ष शेखर गांवकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. शर्वाणी गावकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, तळवणे सरपंच समीर केळकर, उपसरपंच रामचंद्र गावडे, किनळे सरपंच दीपक नाईक, कवठणी सरपंच अजित कवठणकर आणि व्यायामशाळेचे जमीन मालक रघुनाथ पाटकर यांसह पंचक्रोशीतील अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ आणि तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.












