बांदा (प्रतिनिधी) : कास येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त ३ ते १० ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दररोज सकाळी देवीची पूजाअर्चा, दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होणार आहे.
यानिमित्त शुक्रवार ४ रोजी सायंकाळी ६ वाजता वरचा मांगरवाडी येथील महिला संघाची फुगडी, ७ वा. कास ग्रामस्थांचे भजन, रात्री ९ वा. संगीत जुगलबंदी कार्यक्रम होणार आहे. शनिवार ५ रोजी सायंकाळी ६ वा. देऊळवाडी महिलांची फुगडी, रात्री ८ वा. ह. भ. प. ऋचा संजय पिळणकर (माणगाव) यांचे कीर्तन, रात्री ९ वा. मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ वेंगुर्ला यांचे वारकरी भजन होणार आहे.
रविवार ६ रोजी सकाळी ९ वा. मोफत आरोग्य शिबीर, सायंकाळी ६ वा. नवरंग महिला फुगडी ग्रुपचा फुगडी कार्यक्रम, सायंकाळी ७ वा. संगीत रजनी संध्या हा संगीत कार्यक्रम, रात्री ९ वा. मातोड पेंडूर येथील वारकरी भजन, रात्री १० वा. वावळेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. सोमवार ७ रोजी सायं ६ वा. जय भवानी फुगडी ग्रुप मुंडासबागवाडी यांचा फुगडी कार्यक्रम, ७ वा. स्थानिकांचे भजन, रात्री ९ वा. कलेश्वर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल.
मंगळवार ८ रोजी सायंकाळी ६ वा. मळीवाडी महिलांची फुगडी, ७ वा. महाआरती, ७:३० वाजता कास ग्रामस्थांचे भजन, रात्री ८ वा. श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ यांचा फुगडी कार्यक्रम, रात्री ९ वा. कथ्थक नृत्य विशारद मृणाल सावंत यांचे नृत्य सादरीकरण होईल. बुधवार ९ रोजी सायंकाळी ६ वा. काळभैरव महिला फुगडी ग्रुप राणेवाडी यांची फुगडी, ७ वा. कास ग्रामस्थांचे भजन, रात्री ८ वा. श्री देव ब्राह्मण प्रसादिक भजन मंडळ रेडी यांचे भजन, रात्री ९ वा. प्रसिद्ध निवेदक बादल चौधरी यांच्या समवेत ‘खेळ पैठणीचा’ हा महिलांसाठी कार्यक्रम होईल.
गुरुवार १० रोजी सायंकाळी ६ वा. महालक्ष्मी फुगडी ग्रुप पंडितवाडी यांची फुगडी, सायंकाळी ७ वा. कास ग्रामस्थांचे भजन, रात्री १० वा. चेंदवणकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होईल. तसेच पावणेर उत्सवानिमित्त १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वा. जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कास ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
————










