चिपळूण आगारातून नवरात्रोत्सवात देवदर्शनासाठी सोडणाऱ्या बस सेवेला ब्रेक

 

भारमन अभावी बस रद्द, मिनी बस उपलब्ध नाहीत

महिला वर्ग नाराज

चिपळूण (वार्ताहर) : नवरात्र उत्सवामध्ये चिपळूण तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थानाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत असते. यास पार्श्वभूमीवर गेले कित्येक वर्ष चिपळूण आगारामार्फत या देवस्थान मार्गावर भाविकांच्या सेवेसाठी विशेष बस सेवा सुरू केली जाते. मात्र यावर्षी या बस सेवेला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगारात मिनी बस उपलब्ध नाही. त्याशिवाय नवरात्र उत्सवात सोडण्यात येणाऱ्या असून एसटी बसेस भारमान सुद्धा कमी येत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे यंदाच्या नवरोत्सवासाठी केवळ मोरवने व तुरंबव या मार्गावर विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

ही बस सेवा ५ ऑक्टोबर पासून सुरू केली जाणार आहे . चिपळूण तालुक्यात नवरात्र उत्सव धामधूम मध्ये सुरू झाला आहे. या उत्सवा दरम्यान भावीक व महिलावर्ग मोठ्या संख्येने चिपळूण येथील विविध प्रसिद्ध देवस्थान यांना भेटी देऊन दर्शन घेतात. यामुळे दरवर्षी मिरजोळी येथील श्री महालक्ष्मी देवी, टेरव येथील कुलस्वामिनी भवानी वाघजाई देवी, धामणवणे येथील श्री विंधवासीनी देवी, गोवळकोट येथील श्री देवी करंजेश्वरी, तूरंबव येथील श्री शारदादेवी, मोरवणे श्री रामवरदायीनी देवी, आदि सर्व मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून जातात.

भाविकांना या देवस्थानाच्या भेटी घेता याव्यात यासाठी त्यांच्या सेवेकरता चिपळूण आगारामार्फत प्रतिवर्षी नवरात्र उत्सवात विशेष बस सेवेची सुविधा उपलब्ध केली जाते. त्याचा चांगला फायदा महिला वर्गासह भाविकांना होतो. या देवस्थानांपैकी काही मंदिराकडे जाणारा मार्ग अरुंद वळणाचा व चढउताराचा आहे. अशा मार्गावर एसटी बसेस पाठवणे अडचणी ठरत आहे. त्यासाठी मिनी बसेस गरजेचे आहेत. मात्र चिपळूण आगारात एकही मिनी बस उपलब्ध नाही. काही मार्ग सोडल्यात बहुतांशी मार्गावर धावणाऱ्या विशेष बस सेवेतून पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने चिपळूण आगाराला भारमान अभावी तोटा सोसावा द्यावे लागत आहे. यामुळे चिपळूण आगारासमोर दरवर्षीच्या सर्व मार्गावर बस सेवा कशी सुरू करावी, असा पेच निर्माण झाला आहे. नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाल्याने चिपळूण आगार व्यवस्थापनाने यंदा केवळ मोरवणे व तुरंबव या दोनच मार्गावर एसटी बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.