आडाळी एमआयडीस २५० उद्योग देणाऱ्या प्रकल्पाचे चार दिवसात भूमीपूजन

आंबोली चौकुळ व गेळे येथील ३५ सेक्शन हटविल्याने जमीन प्रश्न निकाली 

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती 

सावंतवाडी । प्रतिनिधी : दोडामार्ग आडाळी येथे औद्योगिक क्षेत्रातील सर्व प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी पाऊले उचलण्यात आली असून येत्या चार दिवसात अडीचशे युवकांना रोजगार देणाऱ्या उद्योगाचे भूमीपूजन उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार असून यावेळी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दरम्यान, तालुक्यातील आंबोली चौकुळ व गेळे येथील वन जमिनीचा प्रश्न सुटला आहे त्या संदर्भातील ३५ सेक्शन उठवण्यातसाठी शासनाच्या संबंधित विभागाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून येथील त्यांचा सुरू असलेल्या लढायला आता खऱ्या अर्थाने यश मिळाले आहे. यासाठी प्रयत्न केलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले.

मंत्री दीपक केसरकर यांनी आज दूरस्थप्रणालीद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते ते म्हणाले, आडाळी एमआयडीसी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील फार्मासिटिकल कंपनी येणार आहे. त्यांनी यासंदर्भात आडाळी येथे येऊन पाहणी केली आहे. लवकरच सदर कंपनी या ठिकाणी उद्योग सुरू करणार आहे. याआधी आडाळी येथे उद्योग सुरू करण्यास ज्यांनी जमिनी घेतल्या आहेत त्यांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे काही प्रमाणात त्या ठिकाणी असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी विधी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. लाईट तसेच पाणी यावर काम सुरू असून निश्चितच या ठिकाणी मोठा प्रतिसाद उद्योजकांकडून मिळणार असून शासनही या संदर्भात कटिबद्ध आहे.

ते पुढे म्हणाले, शिरोडा वेळागर येथील ताज हॉटेलचे भूमिपूजनही लवकरात लवकर होणार आहे. परंतु त्या ठिकाणी काही जमीन बघून मिळण्याची मागणी तेथील जमीन धारकांनी केली होती त्या संदर्भात आज मुंबई येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली यामध्ये जोपर्यंत ग्रामस्थांची हरकत असलेली नऊ हेक्टर जमिनी वगळण्यासंदर्भात सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत कुठलेही बांधकाम सदर भागात होणार नाही याबाबतची याबाबत एकी आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांची शंका दूर झाली असून लवकरच या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

 

तर ४५ कोटी रुपये मंजूर असूनही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रश्न काही सह्या अभावी रखडला आहे. येत्या दोन दिवसात सह्या नाही झाल्यास हा प्रकल्प नाईलाजाने दुसरीकडे स्थलांतरित करावा लागेल, असेही केसरकर म्हणाले.

माझ्या मतदारसंघात टेंडर मिळवण्यासाठी ठेकेदारांकडून बाऊन्सर आणून दादागिरी केली जात असेल तर ती मी मुळीच खपवून घेणार नाही तसेच पैशांची मस्ती चालू देणार नाही अशा कोणत्याही ठेकेदाराला मी कधीच माफ करणार नाही जड असा इशाराही त्यांनी दिला. माझ्या मतदारसंघातील लोक चांगले ओळखतात मी कामे केली नसती.

तर मला तीन वेळा आमदार म्हणून निवडून दिले नसते त्यामुळे कोणीही बॅनरबाजी केली. तरीही मला फरक पडत नाही लोक माझ्यासोबत आहेत बोलणाऱ्या लोकांना कामे नसल्यामुळे ते बोलत आहेत. मल्टीस्पेशालिटी आणि सावंतवाडी बसस्थानक हा प्रश्न माझ्या आश्वासनापैकी पैकी राहिला आहे. तो सोडवणे माझे कर्तव्य आहे परंतु मल्टीस्पेशालिटी संदर्भात वारंवार माझे प्रयत्न सुरू असताना आजही राजघराण्याकडून काही सह्या शिल्लक राहिल्या असल्याने तो प्रश्न निकाली लागण्यास वेळ लागत आहे. येत्या दोन दिवसात त्यावर सह्या न झाल्यास स्पेशालिटी हे दुसरीकडे स्थलांतरित केल्याशिवाय पर्याय नाही तर चालकाचे काम हे बीओटी तत्त्वावर लवकरात लवकर सुरू होणार आहे , असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.