सावंतवाडी : जादूगार केतनकुमार उर्फ केतन सावंत यांनी आज जादूगार जितेंद्र रघुवीर यांची सदिच्छा भेट घेतली. सावंतवाडीत शनिवार व रविवारी जादूगार रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत दाखल झालेल्या जादूगार रघुवीर यांची भेट घेत त्यांनी चर्चा केली.
जादूगार केतनकुमार यांना फेब्रुवारीमध्ये इंटरनॅशनल पुरस्कार मिळाला होता. याबाबत जादूगार रघुवीर यांनी केतन यांचे कौतुक केले. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या सावंतवाडी मधील कार्यक्रमाला जास्तीत जास्त जादूप्रेमी नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जादूगार केतनकुमार यांनी केले आहे.







