रत्नागिरी | प्रतिनिधी : विविध सामाजिक कार्ये करणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनतर्फे 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता हॉटेल संगम रीजन्सी रेल्वे स्टेशन रोड, रत्नागिरी मधील हॉलमध्ये “पंखीडा” – रास दांडिया नाईट चे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात म्युझिक, दांडिया, सरप्राईज गिफ्ट यासह अनलिमिटेड व्हेज जेवण यांचा आस्वाद घेण्याची संधी क्लब ने रत्नागिरीकरांसाठी उपलब्ध करून दिली आहे. कार्यक्रमातून होणाऱ्या निधी संकलनातून क्लब द्वारे विविध सामाजिक उपक्रम केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात दांडीयाचा आणि जेवणाचा आस्वाद घेऊन सामाजिक कार्यासाठी हातभार लावणार आहात. आपल्या सोबत येणाऱ्या सात वर्षाखालील लहान मुलांना फ्री एन्ट्री मिळणार आहे.
कार्यक्रमाचे योग्य नियोजनासाठी मर्यादित एन्ट्री पासेस मर्यादित आहेत. तरी आपण वर दिलेल्या क्यूआर कोड स्कॅन करून किंवा इव्हेंट चेअरमन डॉ. प्रियांका कांबळे यांच्या priyankakamble0365-2@okhdfcbank या UPI आयडी वर 499/- चे देणगी मूल्य देऊन 8888685577 किंवा 9049433326 वर संपर्क साधावा असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन चे प्रेसिडेंट डॉ. स्वप्ना करे यांनी केले आहे.










