सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ निवडणुक
सकाळपासूनच मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती व मेहनत पाहता श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनल चा विजय निश्चित असून सायंकाळी गुलाल आम्हीच उधळणार, असा ठाम विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केला. दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी सावंतवाडी येथील मतदान केंद्राला भेट दिली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी सभापती अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक रवि मडगांवकर, गजानन गावडे, माजी संचालक गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी सभापती राजू परब, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, मनोज नाईक, आनंद नेवगी, श्री देव पाटेकर सहकार परिर्वतन पॅनलचे उमेदवार प्रमोद गावडे, आत्माराम गावडे, दत्ताराम कोळंबेकर, प्रवीण देसाई, दत्ताराम हरमलकर, प्रभाकर राऊळ, रघुनाथ रेडकर, प्रमोद सावंत, शशिकांत गावडे, ज्ञानेश परब, विनायक राऊळ, आनारोजीन लोबो, रश्मी निर्गुण, भगवान जाधव, नारायण हिराप यांसह बांदा विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, मळगांव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, विकी आजगांवकर, माजी उपसभापती संदीप नेमळेकर, कोलगाव उपसरपंच दिनेश सारंग, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, बाबा राऊळ, विनोद सावंत, मधु देसाई, जितेंद्र गांवकर, निळकंठ बुगडे, दिलीप परब, मकरंद तोरसकर यांसह भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तत्पूर्वी सकाळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही मतदान केंद्रावर भेट देत मतदानाचा आपला अधिकार बजावला. यावेळी त्यांनीही श्री देव पाटेकर सहकार परिवर्तन पॅनलच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. आमच्या पॅनलचा विजय निश्चित असून यापुढे सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अशोक दळवी, बबन राणे, तानाजी वाडकर , राजन रेडकर , आनारोजीन लोबो आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Sindhudurg