अनेक कार्यक्रम झाले रद्द; पोलसह झाडे कोसळली
विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित
रत्नागिरी | प्रतिनिधी
रविवारी संध्याकाळी रत्नागिरीत पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली. पावसासह सोसाट्याच्या वारा वाहिला त्यामुळे काही ठिकाणी छोटी मोठी झाडे पडली तर विजेचे पोल सुध्दा पडले. शहरातील अभ्युदय नगर येथील गांजलेला पोल विजेच्या तारांवर कलांडल्याने या परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला
आज रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टी चे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. मात्र परतीच्या पावसाचा मोठा फटका या कार्यक्रमाला बसला. समुद्राच्या शेजारीच हा कार्यक्रम असल्याने सोसाट्याच्या वाऱ्याने येथील खुर्च्या उडून गेल्या. येथे समुद्री किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 7 वाजता होणार असल्याचे कळवण्यात आले आहे.
दरम्यान कोकण रेल्वे क्या रत्नागिरी स्थानकाचे नूतनीकरण सुरू आहे. मात्र परतीच्या पाऊस आणि सोसाट्याच्या वारा यामुळे येथील पीओपी कोसळले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे
या पावासचा फटका अनेक ठिकाणी बसला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे












