महामार्गावर खवटी नजीक १ लाख २७ हजारांची गोवा बनावटीची दारू सह टेम्पो जप्त

 

 
खेड(प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्ग वरील खवटी नजीक येथील पोलिसांनी पकडलेल्या टेम्पो मधून १ लाख २७ हजारांची गोवा बनावटीच्या दारू सह ४ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा ५ लाख २७ हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात येथील पोलिसांना यश आले ही कारवाई ५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
 मुनाफ इस्माईल मुकादम वय ४० ‘वर्षे रा. अनपुरवाडी’ ता. देवगड जि.सिंधुदूर्ग असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो त्याच्या ताब्यातील  टेम्पो क्र एम.एच.०७ एजे ३०४१ हा चिपळुन ते कशेडी असा प्रवास करीत असताना  गोवा बनावटीची अवैध दारु वाहतुकिचा कोणताही परवाना नसताना  खवटी येथे   बिगरपरवाना गैरकायदा वाहतुक करताना व ताचे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळुन आला.
 पोलिसानी जप्त केलेल्या मुद्दे माला मध्ये १,लाख २७,हजार ६८०  रुपये किंमतीची व्हिस्की   दारुचे २८ बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये ४८ क्वार्टर,   ४,लाख  रुपये किंमतीचा अवैध दारु वाहतुक करण्याकरीता वापरलेला पांढ-या रंगाचा टेम्पो असा ५ लाख २७ हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात आला