खेड(प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत भरणे नवभारत हायस्कूलच्या मैदानात झालेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत येथील एलटीटी इंग्लिश मिडियम स्कूलमधील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या संघाची जिल्हास्तरं कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंना क्रीडाशिक्षक पांडुरंग विटमल, सुशांत पाटील, अमर जड्याळ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अहमद मुकादम यांच्याहस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सदस्य वाहिद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खतीब, प्रेमल चिखले, चंद्रकिरण वैद्य, डॉ. पुष्कर नेने, विलीन पाटणे, समन्वयक सेबास्टियन जॉय, मुख्याध्यापक जी.बी. सारंग, प्राथमिकच्या समन्वयिका एल्सी जॉय, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका पी.एस. कुडाळकर, प्राथमिकच्या प्रभारी मुख्याध्यापिका सिद्धी वंडकर आदी उपस्थित होते.








