दापोली | प्रतिनिधी :- दापोबी शहरातील जहीद काॅम्प्लेक्स येथे कार ०७ ऑक्टोबर रोजी उनाड कुत्र्यांनी एका चार वर्षीय मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात त्या मुलीच्या मेंदूचा लचका कुत्र्यांनी तोडल्याने गंभीर दुखापत झाली.त्या मुलीला डेरवण येथे पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या उनाड कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी करणारे निवेदन आज जहिद काॅम्प्लेक्स आणि काळकाई कोंड दापोली येथील फातिमा काॅम्प्लेक्स येथील नागरिकांनी दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष,तहसीलदार दापोली ,पोलीस निरीक्षक दापोली व जिल्हाधिकारी दापोली यांना सादर केले आहे.












