भजन प्रेमी नागरिकांना मिळणार सुप्रसिद्ध बुवा अमित शिरसेकर यांच्या भजनाचा लाभ

 

नवलादेवी सेवाभावी मंडळ कोत्रेवाडी लांजा च्या वतीने आयोजन

लांजा (प्रतिनिधी) कोत्रेवाडी ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री नवलादेवी मंदिरात नवरात्रौत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. याच अनुषंगाने गुरूवार दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता राजापूर शिरसे येथील सुप्रसिध्द बुवा अमित
शिर्सेकर यांचे भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

 

नवरात्रौत्सवा निमित्ताने आठव्या माळेला
लांजा शहरातील नागरिकांना कोकणरत्न बुवा संतोष शिरसेकर यांचे शिष्य रत्नभूषण बुवा अमित शिरसेकर यांचे भजनाचा लाभ घेता येणार आहे.श्रीराम प्रासादिक भजन मंडळ शिरसे, राजापूरच्या या भजनात पखवाज वादक म्हणून – कु.अजित शिर्सेकर व तबला वादक म्हणून- सौरभ भोगले हे आहेत.
गुरुवार १० ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी लांजा शहरातील भजन प्रेमींनी‌उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा , असे आवाहन श्री नवलादेवी सेवाभावी मंडळाचे वतीने करण्यात आला आहे.