रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील (स्वायत्त) आजी-माजी आणि इतर विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमा अंतर्गत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी संचलित अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी व गोगटे-जोगळेकर महाविद्यालय यांच्यासंयुक्त विद्यमाने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणास सुरुवात केली जाणारआहे.
करिअर कट्टा अंतर्गत असणाऱ्यामोबाईल अॅपद्वारे सर्व विद्यार्थ्यासाठी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठीच्या लेखी परीक्षेची तयारी करण्याचे मार्गदर्शन सत्र हे करिअर कट्टा कडून घेतले जाईल. तीन महिने ऑनलाईन असणाऱ्या प्रशिक्षणाबरोबरच आतापर्यंत झालेल्या भरतीपूर्व प्रशिक्षणाचा सर्व प्रश्नांचा संच ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना सरावासाठी उपलब्ध असेल. महिन्यातून दोन वेळेला झालेल्या अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने महविद्यालयामध्ये घेतली जाईल. पेपर तपासून त्याचे गुण आणि झालेल्या चुकांचे मार्गदर्शन महाविद्यालयात केले जाईल.
पोलीस भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या वेगवेगळ्या मैदानी प्रशिक्षणाची तयारी महाविद्यालयाच्या मैदानावर करून घेतली जाईल आणि इतर साधनसामुग्री महाविद्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात येईल. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी करिअर कट्टा उपक्रमासाठी ३६५ रुपये भरून प्रवेश घेतला असेल त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाची कसलीच फी असणार नाही. जे आजी-माजी विद्यार्थी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना प्रवेश घेताना करिअर कट्टा उपक्रमाची ३६५ रुपये फी भरावी लागेल. महाविद्लयाच्या व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश घेताना रुपये १५०० इतकी फी भरावी लागेल. भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याची निवड मैदानी चाचणी,मुलाखत घेऊन केली जाईल.
प्रत्येक बॅच १०० विद्यार्थ्यांची असेल. बॅचचा कालावधी ९० दिवसाचा असेल. पहिली बॅच ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर या तीन महिन्यांसाठी असेल. बॅचचा तीन महिन्याचा कालावधी संपल्यानंतर देखील विद्यार्थी मैदानावर सरावासाठी येऊ शकतील. अधिक माहितीसाठी डॉ. शिवाजी उकरंडे, समन्वयक करिअर कट्टा (मोबा. ९६५७०१५०४८) आणि डॉ. विनोद शिंदे, प्रशिक्षक व मार्गदर्शक (मोबा. ९४२११३७४५३) यांना संपर्क करावा. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमी, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय येथे जाऊन नोंदणी अर्ज भरावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.











