खेड (प्रतिनिधी) सातारा येथील सज्जनगड श्रीसमर्थ सेवा मंडळ संचलित श्रीसमर्थ विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या प्रथमा व द्वितीया परीक्षेत भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
१५ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता, तर १४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. प्रथमा श्रेणी परीक्षेमध्ये आहाना बुटाला, प्रशिक तांबे, श्लोक शिर्के, तर द्वितीया श्रेणी परीक्षेत मृण्मयी दामले, सार्थक गोवळकर, स्वराज पवार यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. संस्था चेअरमन बिपीन पाटणे, मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.








