वैभववाडी आयटीआय ला शहीद विजय साळसकर यांचे नाव

१४ ऑक्टोबर रोजी होणार नामकरण सोहळा

आमदार नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती

मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे : प्रमोद रावराणे यांचे आवाहन

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) एडगांव गावंचे सुपुत्र शहिद विजय साळसकर यांचे नाव शासनाने दिले आहे. हा नामकरण सोहळा सोमवार दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. संपन्न होणार आहे. याप्रसंगी कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत.
तरी या सोहळ्याला तालुक्यातील पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य सह. पणन महासंघाचे संचालक, एडगांव – वायंबोशी गावचे माजी सरपंच प्रमोद रावराणे यांनी केले आहे.