कोकण मार्गावर पहिली दीपावली स्पेशल १८ पासून धावणार

 
खेड (प्रतिनिधी)
दीपावली सुट्टीच्या हंगामासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या ४ दीपावली स्पेशलपैकी एलटीटी-सावंतवाडी साप्ताहिक दीपावली स्पेशल १८ ऑक्टोबरपासून कोकण मार्गावर धावणार आहे. स्पेशलच्या ८ फेऱ्यांचा समावेश आहे.
०११७९/०११८० क्रमांकाची एलटीटी-सावंतवाडी स्पेशल १८, २५ ऑक्टोबर १ व ८ नोव्हेंबर रोजी धावेल. एलटीटीहून सकाळी ८.२० वाजता सुटणारी स्पेशल त्यात दिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडी येथे पोहचेल. परतीच्या प्रवासात सावंतवाडी येथून रात्री १०.२० वाजता सुटून दुसऱ्या सकाळी १०.४० वाजता एलटीटीला पोहचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबेल.