खेड(प्रतिनिधी) तालुक्यात आतापर्यंत ४,४६९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने धरणेही तुडूंब भरली आहेत.
शेतीसाठी उपयुक्त पाऊस पडल्याने शेतकरीही सुखावले व आहेत. बुधवारी रात्रीपासून पावसाची पुन्हा रिपरिप सुरू झाली आहे. गुरूवारीही सकाळच्या सुमारास तर शुक्रवारी रात्री पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या .












