आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शाळा गजानन विद्यालय पाट चे यश..

 

वेंगुर्ले | प्रतिनिधी : मुंबई येथे शोतोकान इंटरनॅशनल कराटे डो फेडरेशन ने आयोजित केलेल्या २१ व्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गजानन विद्यालय, पाट येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली.
या स्पर्धेसाठी भारतातील विविध भागांमधून एकूण ४३ शाळांतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. गजानन विद्यालय पाट शाळेतील एकूण १६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सहभाग घेतला.

 

 

त्यांनी ०९ सुवर्ण, ०७ रौप्य व २० कांस्य असे एकूण ३६ पदके पटकावली आहेत.
शाळा गजानन विद्यालय पाट येथे कराटे हा नाविण्यपूर्ण उपक्रम दिनांक २३ जानेवारी २०२४ पासून राबविला जातोय याचे प्रशिक्षक श्री महादेव धोंडू वेळकर हे हा क्लास मोफत चालवतात . मुलांना स्पर्धेसाठी तयार करणे साठी त्यांनी अतिशय मेहनत घेऊन हे यश मुलांना मिळालेले आहे. यात पूर्वी कोचरेकर , मिहिर परब , ओम मालणकर, गौरांग दाभोलकर , आर्यन पेडणेकर , आदर्श पेडणेकर , राजदत्त राऊळ , आरुष राऊळ , तनया गोसावी , भाग्यश्री खोरजुवेकर, गुंजन खोरजुवेकर , माहेश्वरी परब , तेजल पाटकर , चिन्मय शेगले , निहार जळवी , विनय कुडाळकर या मुलांनी भाग घेतला. त्यांच्या या यथाबद्दल पालकवर्ग व शिक्षकवृंद यांच्याकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.