वेंगुर्ला कँम्प स्टेडियम येथे वृक्षारोपण

सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला व न.प. वेंगुर्ला यांचा संयुक्त उपक्रम

वेंगुर्ले l प्रतिनिधी :सचिन वालावलकर मित्रमंडळ वेंगुर्ला व नगरपरीषद वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यामाने वेंगुर्ला कॅम्प स्टेडियम येथे भव्य वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाला सिधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.सचिन वालावलकर तसेच मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संतोष परब, उपाध्यक्ष ॲड. श्री. मनीष सातार्डेकर, शिवसेना शहर प्रमुख श्री. उमेश येरम, वेंगुर्ला नगरपरीषदेचे श्री. प्रवीण कांबळी, श्री. सागर चौधरी, कलावलचे अध्यक्ष श्री. बाळू खामकर, सचिन वालावलकर मित्र मंडळाचे सदस्य श्री. संदेश रेडकर, श्री. शैलेश केसरकर, श्री. लवू गावडे, श्री. प्रशांत सावंत, श्री. जयंत सावंत, श्री.जयेश गावडे, श्री पिंटू कुडपकर, श्री. बाळा आरावंदेकर, श्री. किशोर घाडी, श्री. विशाल राऊत, श्री.यशवंत किनळेकर, श्री.संजय परब, श्री.राजू परब, श्री.मनी रेवणकर, श्री देवीदास वालावलकर, श्री.सुचित परब, सागर शिरसाट, किडा प्रशिक्षक सौ. संजीवनी परब, श्री जया चुडनाईक तसेच मंडळाचे इतर सर्व सदस्य व वेंगुर्ला नगरपरीषद इतर कर्मचारी उपस्थीत होते, यावेळी कॅम्प स्टेडियम येथे नारळ, काजु, आंबा, फणस, चिकु, कोकम, पेरु, बदाम, जांभुळ, कौटी चाफा, चाफा, अश्या विविध प्रकारच्या फळझाडांची व

फुलझाडांची लागवड करण्यात आली. तेव्हा वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी श्री. सचिन वालावलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले कि, ग्लोबल वार्मिंग ही संपुर्ण जगासाठी एक मोठी समस्या बनत चाललेली असुन त्यावर मात करायची असल्यास प्रत्तेक नागरीकाने किमान वर्षाला एकतरी झाड लावले पाहीजे व ते जगवले पाहीजे. वेंगुर्ला शहराच्या सर्वांगिण विकासासाठी जे जे करणे शक्य आहे ते सर्वकाही श्री. दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातुन आमच्याकडून केले जाईल व वेंगुर्ला शहराला पर्यटनावर आधारीत विकासाची नवी दिशा देण्यासाठी यापुढेही सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे मत देखील श्री. सचिन वालावलकर यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच अतिशय उत्तम आयोजन केल्याबद्दल मंडळाचे तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले.