खेड मध्ये वंचित बहुजन आघाडी ला खिंडार रिपाई मध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश

 

खेड(प्रतिनिधी) ऐन निवडणूकीच्या तोंडावर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी ला खिंडार पडले असून खेड तालुक्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षात मुंबई येथील संविधान बंगला येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला

ना आठवले यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे स्वागत केले जाहीर प्रवेश कर्त्या मध्ये वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी जिल्हा सचिव महेंद्र पवार खेड तालुका उपाध्यक्ष अशोक सकपाळ सुकीवली चे संघटक श्रीधर येलवे, अनंत पवार, प्रफुल येलवे ,फाईक कावळेकरं , बाळाराम शिर्के ,महेंद्र येलवे, दिपराज येलवे, अनंत येलवे ,रत्नदीप तांबे ,मुकेश मोहिते ,निलेश तांबे ,मोत्तम मर्चंडे आदी ,प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला

यावेळी कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे खेड तालुक्याचे सुपुत्र कोकण प्रांत युवक अध्यक्ष *सुशांतभाई सकपाळ, खेड तालुका युवक अध्यक्ष विकास धोत्रे प्रमुख पदाधिकारी संतोष कापसे ,मिलिंद तांबे आदी उपस्थित होते