आपेडे मध्ये धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ आपेडे व बौद्धजन सेवा संघ आपेडे (मुंबई) नालंदा बौद्ध विहार आपेडे या ठिकाणी ६८ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाला

या कार्यक्रमाला खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ या संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंदार हळदे उपाध्यक्ष आपल्या भावकीचे अध्यक्ष सुधाकर तुळशीराम धोत्रे सी आर कांबळे शिक्षक शिंदे , मोहिते गावचे पोलीस पाटील नितीन लांबडे ,माजी पोलीस पाटील रमेश धोत्रे मुंबईच्या शाखेचे सचिव संतोष जयराम धोत्रे माजी संदेश वाहक महेश सोनवणे खजिनदार मंगेश धोत्रे सेक्रेटरी मोहन सोनवणे प्रदिप धोत्रे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते

सकाळी धम्म पूजा पाठ घेण्यात आली त्या नंतर अल्पउपहार देण्यात आला व संध्याकाळी वाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून गुण गौरव सोहळा साजरा करण्यात आला व मान्यवरांचे शाळ व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले