वराड गावातील विविध विकासकामांचा भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ

 

मालवण | प्रतिनिधी : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत वराड गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन भाजपा नेते निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

वराड रस्ता ते जैनोबा देवस्थानाकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वराड म्हावळूंगेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे,
वराड घोळवळवाडी बोलये टेंबकडे जाणारा रस्ता खाडीकरण डांबरीकरण करणे, वराड कुसरवेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, वराड कुसरवे कोल्ह्याचे टेंब रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे ही विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. याबाबत खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांचे नागरिकांनी आभार मानले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, भाजपा जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर, माजी जिप सभापती संतोष साठविलकर वराड सरपंच शलाका रावले, तालुका महिला अध्यक्ष माधुरी मसुरकर, वराड शक्ती केंद्र प्रमुख, बूथ कमिटी अध्यक्ष मोहन मसुरकर, बूथ कमिटी अध्यक्ष अजय चव्हाण, बूथ कमिटी अध्यक्ष हनुमंत सरमळकर व वराड भाजप कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.